रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (11:10 IST)

15 विद्यार्थी 2 शिक्षक पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना आणि नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. रायगडमध्ये गेल्या 24 तासांत 700 हून अधिक रुग्णांची  नोंद झाली आहे. महाड तालुक्यातील ऐका शाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे त्यामुळे  शाळा व्यवस्थापन आणि तालुका आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. या शाळेतील 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कोंडी होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे .