बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (23:36 IST)

Omicron : मुंबईत कोरोनाचे 8,082 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

महाराष्ट्रात आज 12 हजार 160 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील एकूण 12 हजार 160 नवीन रुग्णांपैकी एकट्या मुंबईत 8,082 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईतल्या आजच्या 8,082 नवीन रुग्णांपैकी 574 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यापैकी 71 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. तर मुंबईत कोव्हिडमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आज ओमिक्रॉनचा संसर्ग असणारे 68 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी मुंबई 40, पुणे मनपा 14, नागपूर 4, पुणे ग्रामीण आणि पनवेल प्रत्येकी 3, कोल्हापूर, नवी मुंबईस रायगड, सातारा प्रत्येकी 1 असे रुग्ण आढळले आहेत.