बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:14 IST)

राज्यात सोमवारी 15 हजार 140 नवे कोरोनाबाधित रुग्ण

corona
राज्यातील कोरोनाच्या  रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे.  कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात सोमवारी 15 हजार 140 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर   91 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
 
राज्यात सोमवारी  35 हजार 453 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.42 टक्के झाले आहे. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.85 टक्के झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये 77 लाख 21 हजार 109 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 2 लाख 07 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये  आहेत.