बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:07 IST)

राज्यात रविवारी 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात कोरोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत आहे. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (दि.29) राज्यात 27,971 रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी यामध्ये आणखी घट झाली आहे. राज्यात रविवारी  22 हजार 444 नवे कोरोनाबाधित  रुग्ण आढळून आले आहेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
 
राज्यात आजपर्यंत 73 लाख 31 हजार 806 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.14 टक्के झाले आहे. राज्यात आज 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.85 टक्के झाला आहे.
 
राज्यात 77 लाख 05 हजार 969 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.सध्या 2 लाख 27 हजार 711 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.राज्यात 12 लाख 61 हजार 198 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.