गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (08:29 IST)

राज्यात १७,०६६ कोरोनाचे नवे रुग्ण दाखल

राज्यात कोरोनाचे सोमवारी १७,०६६ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १५,७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १०,७७,३७४ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ७,५५,८५० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,९१,२५६ रुग्ण उपचार घेत आहेत.
 
राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.७७ टक्के इतका आहे.आतापर्यंत राज्यात ५३,२१,११६ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १०,७७,३७४ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या राज्यात १७,१२,१६० जण होम क्वारंटाईन असून ३७,१९८ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.