शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (08:42 IST)

राज्यात शुक्रवारी 2 हजार 068 नव्या रुग्णांचे निदान

2 thousand 068 new patients diagnosed in the state on Friday राज्यात शुक्रवारी 2 हजार 068 नव्या रुग्णांचे निदानMarathi CoronaVirus News  In Webdunia Marathi
राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत  मागील काही दिवसांपासून दररोज घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूसंख्याही कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात शुक्रवारी 2 हजार 068 नव्या रुग्णांचे  निदान झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने सक्रिय रुग्णांचीसंख्या कमी होत आहे.
 
 राज्यात शुक्रवारी 4 हजार 709 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 86 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.85 टक्के झाले आहे. राज्यात 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 547 इतकी आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
 
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 70 लाख 01 हजार 972 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 55 हजार 359 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 21 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 37 हजार 252 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.