भूतलावरील देवदूत….2 हजार 500 स्थलांतरित मजुरांना मदत करणारे भूतलावरील देवदूत

sachin shejal
Last Modified गुरूवार, 9 एप्रिल 2020 (09:36 IST)
उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड या राज्यातील तावर पोट असणारे जवळपास 2 हजार 500 स्थलांतरित मजूर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अलिबाग तालुक्यात राहत आहेत. या स्थलांतरित मजूरांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शासनाने आपली जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे.

अलिबाग तालुक्याचे तहसिलदार सचिन शेजाळ हे या स्थलांतरीत मजूरांची उपासमार होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाने अत्यंत तडफेने काम करताना दिसून येत आहेत. जणू काही ते अलिबाग व आजूबाजूच्या परिसरातील समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्थलांतरीत गरजू मजूर यांच्यातील देवदूतच बनले आहेत. या 2 हजार 500 मजूरांना डाळ, तांदूळ, पीठ, मीठ, हळद, तिखट, खाद्यतेल अशा जीवनावश्यक वस्तू शिधा पॅकिंगमध्ये देण्यात येत आहेत. या संकटकाळात अलिबागमधील विविध समाजसेवी संस्था, व्यापारी आणि काही दानशूर व्यक्तीदेखील त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या मदतीतून जमा झालेला जीवनावश्यक वस्तूंचा शिधा घाऊक स्वरुपात खरेदी करुन अलिबाग शहरातील गुजराथी महाजन सभागृहात आणण्यात येतो.

सद्यस्थितीत 1 हजार किलो डाळ, 5 हजार किलो पीठ, 5 हजार किलो तांदूळ, 1 हजार किलो मीठ, 1 हजार किलो हळद व तिखट आणि 1 हजार किलो खाद्यतेल घाऊक प्रमाणात माल आणले जाते व ते एक किलो वा दोन किलो असे पॅकिंग केले जाते. हे पॅकिंगचे महत्त्वाचे काम उन्नती महिला बचतगटाच्या सुमारे 10 ते 12 महिला बचतगटाच्या प्रमुख पल्लवी जोशी यांच्या पुढाकाराने करीत आहेत. या कामाकरिता रवीकिरण काळे, ऋषीकेश भातखंडे, ओंकार मनोहर आदी सामाजिक कार्यकर्तेही अधिक मदत करीत असून हा पॅकिंग केलेला शिधा यांच्या मदतीने स्थलांतरित मजूरांना देण्यात येतो.
याबरोबरीनेच अलिबाग शहराचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने अलिबाग परिसरात ज्या स्थलांतरीत मजूरांना शिधा दिला तरी जेवण तयार करण्याची सुविधा नाही, अशांना शोधून त्यांना तयार जेवण देण्याची जबाबदारी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून अखंडपणे पार पाडली जात आहे.
या मित्रमंडळाच्या सामाजिक जाणिवेतून दररोज 1 हजार 400 स्थलांतरित गरजू मजूरांना हे जेवण देण्यात येत आहे. यापैकी 1 हजार 200 गरजूंकरिता जेवण तयार करुन देण्यात येते तर उर्वरित 200 जणांना 200 शिवभोजन थाळ्यांचे जेवण
खरेदी करुन देण्यात येते.

याचप्रमाणे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे देखील सामाजिक बांधिलकी जपत दररोज 2 हजार मजूरांना तयार जेवण देत आहेत. नुकतेच थळ ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गावकऱ्यांना,निराश्रित मजूरांना त्यांच्या पुढाकारातून पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे यांच्या हस्ते अन्नधान्य, जेवणाची पाकिटे व फळे वाटपही करण्यात आले.
विशेष म्हणजे सामाजिक कार्य करीत असताना कोणत्याही प्रकारे शासनाने दिलेल्या सूचनांचा, नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात येत असून सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायजरचा वापर, स्वच्छता आदी गोष्टींची पुरेपूर काळजी घेण्यात येते.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

राज्यात जोरदार पावसाचा इशारा

राज्यात जोरदार पावसाचा इशारा
राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा ...

Ranji Trophy: विजेत्या मुंबईला हरवून मध्य प्रदेश ...

Ranji Trophy: विजेत्या मुंबईला हरवून मध्य प्रदेश पहिल्यांदाच चॅम्पियन
मध्य प्रदेश संघाने अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करून रणजी ट्रॉफी 2021-22 चे विजेतेपद ...

सूरज शेळके यांना अखेरचा निरोप

सूरज शेळके यांना अखेरचा निरोप
लडाख मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खटावमधील जवान सुरज शेळके ...

मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील !

मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील !
विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी बंडाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेसोबत काही आमदार गुजरातमधील ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात ...