मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (08:12 IST)

राज्यात 3.15 लाख सक्रिय रुग्ण, 24,752 नवे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. राज्यात सध्या 3.15 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात बुधवारी 24 हजार 752 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
 
आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 50 हजार 907 एवढी झाली आहे. त्यापैकी 52 लाख 41 हजार 833 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून,बुधवारी 23 हजार 065 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 042 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  राज्यात 453 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 91 हजार 341 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 92.76 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 24 हजार 959 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 23 लाख 70 हजार 326 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 19 हजार 943 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.