मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (16:17 IST)

अकोला परिमंडळात म्युकरमायकोसिसचे 234 रुग्ण

राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांत वाढ होत असून अकोला परिमंडळांत म्युकरमायकोसिसचे 234 रुग्ण आढळून आले आहेत. अकोल्यात म्युकरमायकोसिसचे 68 रुग्ण तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
 
जानेवारी महिन्यापासून 25 मे पर्यंत अकोला जिल्ह्यात एकूण 68 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झाली आहे.   या आजाराला घाबरुन न जाता वेळेवर उपचार घेण्याचा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक तथा अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी दिला आहे.
 
अकोला विभागात म्युकरमायकोसिसचे अमरावती जिल्ह्यात सद्यस्थित सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर कोरोना बधितांचा आकडा रोज अधिक असलेल्या वाशिम जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण विभागात सर्वात कमी म्हणजे दोन रुग्ण उपचार घेत आहे.