शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (17:43 IST)

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण का होत आहे ? एम्स चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले

नवी दिल्ली. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर उपचार करण्यावर सरकारचे लक्ष ग्रामीण भागात प्रशिक्षण देणे, रूग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी चांगल्या पद्धती राबविणे आणि फंगल संसर्ग रोखण्यावर उपाय आहे. ग्रामीण भागात साथीच्या रोगाचा प्रसार झाल्याच्या वृत्तांत ते म्हणाले की, देशातील प्रत्येक भागात कोविड व्यवस्थापन केले पाहिजे.
गुलेरिया म्हणाले की, सर्व भागांशी विशेषत: ग्रामीण भागाकडे संपर्क साधला जावा. आरोग्य मंत्रालयाने आणि अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (एम्स) ग्रामीण भागातील कोविडच्या व्यवस्थापनासाठी 30 एप्रिल ते 13 मे पर्यंत एक कार्यक्रम राबवले आहे.या वेळी गृह-विलगीकरण उपचार-औषधे ,आयसीयू,प्रबंधन,तपासण्या,मधुमेहाचे प्रबंधन या विषयांवर वेबिनार आयोजित केले गेले होते. 
देशाच्या विविध भागात फंगल संसर्ग होण्याच्या वाढत्या घटनांबाबत त्यांनी सतर्कता दाखवत सांगितले की, रुग्णालयांनी संसर्ग रोखण्यासाठीच्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे.
 
गुलेरिया म्हणाले की फंगल किंवा जीवाणूजन्य रोगांमुळे दुय्यम संसर्गांमध्ये जास्त मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. म्युकर  मायकोसिस ने चेहरा, डोळे,डोळ्याचे मंडळे किंवा मेंदूवर परिणाम होऊ  शकतो, ज्यामुळे दृष्टी जाऊ शकते. हे (संसर्ग) फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतं. ते म्हणाले की स्टिरॉइड्सच्या दुरुपयोगामुळे अशा प्रकारच्या संसर्ग होण्याचे प्रकारही वाढत आहेत.
गुलेरिया म्हणाले की मधुमेह ग्रस्त रुग्ण, कोविड -19 चे रुग्ण आणि स्टिरॉइड्स घेणाऱ्या रुग्णांमध्ये हे फंगल संसर्ग होण्याची शक्यता असते. 
हे टाळण्यासाठी, आपण स्टिरॉइड्सचा गैरवापर थांबविला पाहिजे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी सांगितले की, राज्यात म्यूकेरामायसिस किंवा ब्लॅक फंगसची काही प्रकरणे आली आहे.
विजयन म्हणाले की, महाराष्ट्र आणि गुजरात, केरळमध्येही ब्लॅक फंगस चे काही प्रकार घडले आहे. राज्य वैद्यकीय मंडळाने नमुने गोळा केले असून पुढील तपास केला जात आहे.विजयन म्हणाले की तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजचा संसर्गजन्य रोग विभाग देखील या घडामोडींवर नजर ठेवून आहे.