गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (16:13 IST)

मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

First victim
राज्यात म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढता दिसत आहे. सोमवारी अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिल्या बळीची नोंद झाली. त्यानंतर मंगळवारी मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी नोंदवला गेला आहे.
 
मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये ३६ वर्षीय रुग्णाचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या १५०वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत महापालिकेच्या केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर रुग्णालय आणि कुपर रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन आणि औषधांसाठी महापालिकेने विशेष व्यवस्था स्थापन केली आहे, जेणेकरून महापालिकेच्या रुग्णालयात याचा तुटवडा भासून नये.