आता 100 रुपयांमध्ये कोरोना चाचणी शक्य

RT PCR
Last Updated: मंगळवार, 18 मे 2021 (09:19 IST)
मुंबईतील स्टार्टअप पतंजली फार्माने मुंबई आयआयटीच्या सहकार्याने सर्वसामान्यांना परवडणारे कोरोना चाचणी किट तयार केले आहे. याद्वारे अवघ्या 100 रुपयांमध्ये कोरोना चाचणी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे चाचणी केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांत त्याचा अहवाल मिळणार आहे. जून महिन्यात हे किट वापरात येऊ शकते, अशी अपेक्षा पतंजली फार्माकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. हे किट तयार करण्यासाठी पतंजली फार्माला केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने 75 लाखांचे अर्थसहाय्य केले आहे. तसेच आणखी 75 लाखांचे कर्जही दिले आहे.

यासंदर्भात माहिती देताना पतंजली फार्माचे डॉ. विनय सैनी यांनी सांगितले की, गेल्या 8-9 महिन्यांमध्ये संशोधन करून हे किट तयार केले आहे. ते कोव्हिड केंद्रांना पुरवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. हे किट तयार करताना मुंबईतील अनेकांचे स्वॅब घेण्यात आले.दरम्यान, या किटचा वापर ग्रामीण भागातील केंद्रांना उपयुक्‍त ठरू शकतो. ज्याठिकाणी प्रयोगशाळा नाहीत तेथे हे किट लाभदायक ठरणार आहे. सध्या पतंजली फार्मामार्फत कोरोनाच्या अँटिबॉडी टेस्टवर काम सुरू आहे. तसेच क्षयरोगाचे तत्काळ निदान करणार्‍या पद्धतीवरही काम सुरू असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, ...

1 जुलैला देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदे गटाकडे लक्ष
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला ...

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. काही क्षणांपूर्वीच त्यांनी ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना ...

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्री मंडळ घेणार मोठा निर्णय
रेल्वे मंत्रालयाने मागच्या काही दिवसांपूर्वी पुणे-संगमनेर- नाशिक मार्गावर वेगवान ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, ...

एकनाथ शिंदे बंड :उद्या 11 वाजताच होणार बहुमताची चाचणी, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिला आहे. न्या. सूर्यकांत कौल आणि ...

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू

विजेचा धक्कासख्ख्या भावांचा मृत्यू
शेडला अडकवलेली दुधाची बादली घेताना विजेचा धक्का बसून सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ...