सोमवारी दुपार पर्यंत चक्रिवादळ मुंबईच्या अक्षांशावर येण्याची शक्यता

tauktae cyclone
Last Modified सोमवार, 17 मे 2021 (07:37 IST)
अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, गुहागर,दापोली,मंडणगड या तालुक्यांना चक्रिवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे या भागात सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबईतही चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
अरबी समुद्रात सध्या तोक्ते चक्रिवादळाची अतितीव्र परिस्थिती आहे. वाऱ्याचा वेग हा १५० किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. त्याचप्रमाणे हे चक्रिवादळ गुजरातच्या दिशेने जात असताना समुद्र किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. परंतु
चक्रिवादळाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकरण यांनी दिली आहे.
तोक्ते चक्रिवादळ सध्या मुंबईपासून ४०० हून अधिक किलोमीटरवर आहे. सोमवारी दुपार पर्यंत हे चक्रिवादळ मुंबईच्या अक्षांशावर येण्याची शक्यता आहे. मुंबईपासून २०० किलोमीटर दूर असेल. मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशी परिस्थिती असेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Jammu and Kashmir: राजौरीमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती ...

Jammu and Kashmir:  राजौरीमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला, 2 दहशतवादी ठार, 3 जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी त्यांचे नापाक इरादे थोपवत नाहीत. दरम्यान, दोन दहशतवाद्यांनी ...

रत्नागिरी मार्ग बंद, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

रत्नागिरी मार्ग बंद, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात गेली 4 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या ...

दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित ...

दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचा हल्लाबोल
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी घेतलेला ...

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने ...

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने विद्यापीठाचा निर्णय
महाराष्ट्र भर पावसाचा जेर वाढत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर सह कोकण भागात पावसाने थैमान ...

Almattia Dam : अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणार

Almattia Dam : अलमट्टी धरणातून  विसर्ग वाढवणार
अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सकाळपासून आलमट्टी ...