शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (07:24 IST)

चक्रीवादळामुळे सोमवारी देखील लसीकरण मोहिम बंद

तौते चक्रीवादळामुळे मुंबईत पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई परिसरात कमी असला तरी जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी कोविड १९ लसीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तौते चक्रीवादळ मुंबई जवळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने सोमवारी देखील लसीकरण मोहिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने शहरातील कोविड केअर सेंटरमधील ५८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवले आहे. पालिकेने शनिवारी रात्री बीकेसी (२४३), दहिसर (१८३) आणि मुलुंड (१५४) जंबो कोविड सेवेच्या सुविधा असलेल्या या कोविड सेंटरमधून ५८० रुग्णांना मुंबईतील इतर रुग्णालयात हलवले आहे.