शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:49 IST)

राज्यात ३,५८० नवीन रुग्णांची नोंद, मृत्यूदर २.५७ टक्के

राज्यात गुरुवारी ३,५८० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,०९,९५१ झाली आहे. राज्यात ५४,८९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात  ८९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,०५८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
 
राज्यात ८९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १२, ठाणे ७, वसई-विरार मनपा ५, रायगड ५, नाशिक ६, पुणे ३, सोलापूर ६, नागपूर १८ यांचा समावेश आहे. तर ३,१७१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,०४,८७१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२३,४१,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०९,९५१ (१५.४८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८२,७७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,८१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.