गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (08:35 IST)

राज्यात ३ हजार २८२ नवे कोरोना बाधित सापडले

राज्यात रविवारी कोरोनातून एकूण २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता राज्याचा रिकव्हरी रेट ९४.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झालेल्या १९ लाख ४२ हजार १३६ कोरोना बाधितांपैकी १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार २८२ नवे कोरोना बाधित सापडले आहेत तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.५६ टक्के इतका आहे.