मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (09:04 IST)

राज्यात शुक्रवारी ३,४३१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

The state recorded
राज्यात शुक्रवारी ३,४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,१३,३८२ झाली आहे. राज्यात ५६,८२३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात  ७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,१२९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
 
राज्यात शुक्रवारी ७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ११, ठाणे ६, उल्हासनगर ३, नाशिक ५, पुणे ७, सोलापूर ५, सातारा ३, नागपूर ३ आणि वर्धा ११, अन्य १ यांचा सामावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ७१ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. 
 
तर १,४२७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,०६,२९८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४ टक्के एवढे झाले आहे. आता पर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,०१,६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१३,३८२ (१५.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७७,५२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.