शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 8 मार्च 2020 (15:27 IST)

Coronavirus: बाधितांची संख्या 39 वर पोहोचली

भारतात आता कोरोना बाधितांची संख्या 39 वर पोहोचली आहे. यांपैकी 23 भारतीय तर 16 परदेशी नागरिक आहेत. 
 
केरळमध्ये आढलेल्या तिघांवर उपचारांनंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय लडाखमध्ये 2, तामिळनाडू, तेलंगणा, जयपूर आणि गाजियाबादमध्ये प्रत्येक 1, दिल्लीत 3, आग्र्यामध्ये एकाच कुटुंबातील 6 आणि केरळमध्ये नव्याने आढळून आलेल्या 5 रुग्णांचा समावेश आहे.
 
केरळमध्ये कोरोनाबाधित नवे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण पटनमथिट्ट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यांपैकी तीन लोक इटलीहून परतले आहेत. तर इतर दोन जण त्यांचे नातेवाईक आहेत. या पाचही बाधितांना पटनमथिट्टा जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणी आणि निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 
 
या लोकांच्या कुटुंबियांनी विमानतळावर याची माहिती दिली नव्हती त्यामुळे त्यांची तपासणी होऊ शकली नव्हती. मात्र, आता या पाच लोकांचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.