मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (07:50 IST)

राज्यात बुधवारी ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मंगळवारी रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यात बुधवारी ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी २७ हजार ९१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. परंतु, बुधवारी हा आकडा जवळपास दोन हजारांनी वाढला. तसेच बुधवारी २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,००,७२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.३४ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९७,९२,१४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,१२,९८० (१४.२१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,२९,८१६ व्यक्ती होम क्वारंटाईन, तर १७,८६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
२२७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. मंगळवारी १३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. बुधवारी हा आकडा तब्बल २०० पार गेला. मागील २४ तासांत २२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर १.९४ टक्के इतका आहे. तसेच मुंबईमध्ये मागील २४ तासांत ५३९९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ११ हजार ६८६ इतकी झाली आहे.