1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:51 IST)

राज्यात ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळले

राज्यात डेल्टा  प्लस या नवीन आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज राज्यात आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्यी ही करोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. सोमवारी  राज्यात ५ हजार ८११ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय , राज्यात १०० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.  आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १३५१३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६२,४५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.