बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (08:12 IST)

राज्यात ५ हजार ६०९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दुसरीकडे रोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत असल्याने काहीसे दिलादासायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून करोना निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. राज्यात मंगळवारी  दिवसभारत ७ हजार ७२० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ५ हजार ६०९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय १३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६३,४४२ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३४२०१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१३,४३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६६,१२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.