शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (11:12 IST)

महाराष्ट्रात आतापर्यंत कोविड -19 च्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या 45 प्रकरणांची नोंद झाली आहे

महाराष्ट्रात जीनोम सिक्वन्सिंग दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट ची एकूण 45 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी ही माहिती दिली. विभागाने सांगितले की डेल्टा प्लस व्हेरियंटने बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 
 
उत्तर महाराष्ट्रातील जळगावात 13 आणि किनारपट्टी कोकण विभागातील रत्नागिरीमध्ये 11 रुग्ण आढळले आहेत. विभागाने एका निवेदनात म्हटले आहे, “जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवलेल्या 80 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट (कोरोनाव्हायरस) च्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. 45 रुग्णांपैकी 13 जळगावचे, 11 रत्नागिरीचे, सहा मुंबईचे, पाच ठाण्याचे, तीन पुण्याचे आणि पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमधील प्रत्येकी एक रुग्ण आहेत. 
 
या 45 नमुन्यांपैकी 35 रुग्णांची माहिती विभागाला मिळाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला तर बाकीच्यांना सौम्य आणि मध्यम लक्षणे आहेत. जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यांची नेमकी संख्या आणि वेळ उघड केली गेली नाही.