कोकण रेल्वेचे ५२ कर्मचारी क्वारंटाईन
कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयातील सिग्नल आणि संपर्क विभागातील कर्मचाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला.
५० वर्षी कर्मचारी ९ जून रोजी रोहा तसेच कोलाड येथे येऊन गेला होता. त्यावेळी रत्नागिरी येथूनही कर्मचारीही गेले होते. काही कर्मचाऱ्यांनी एकत्र जेवण घेतले होते. दरम्यान, निधन झालेल्या कर्मचाऱ्याला काही दिवस ताप आला होता. मात्र, ही बाब त्याने कोणाला सांगितलेली नाही, असे त्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी काहींनी सांगितली. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, ५० वर्षी कर्मचारी हा मुंबईत परतल्यानंतर १३ जून रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.