शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 23 मार्च 2020 (14:38 IST)

Corona | महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने वेल्हा परिसरातील तब्बल 26 गावं क्वारंटाईन

पुण्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेल्हा तालुक्यातील एक महिला पॉझिटिव्ह आल्याने आख्खं गाव क्वारंटाईन केलंच, शिवाय खबरदारी म्हणून आजूबाजूची तब्बल 26 गावंही क्वारंटाईन करण्यात आली. वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील एका 41 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पानशेत परिसरातील 26 गावांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या गावामध्ये येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रातंधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.
 
पानशेत परिसरातील साईव,गोरडवाडी, वडाळवाडी, आदी गावांना क्वारंटाईन करण्यात आले असून, या परिसरातील गावामध्ये चेक पोस्ट तयार केले आहे. इथे सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. तर या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय या परिसरात औषध फवारणी सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
 
कोरोना पॉझिटिव्ह असलेली महिला मूळची पुण्याची आहे. ती कामानिमित्त वेल्हा तालुक्यातील या गावांमध्ये गेली होती. ती ज्या ज्या गावात गेली, तिचा ज्यांच्याशी संपर्क आला, त्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. खबरदारी म्हणून वेल्हा परिसरातील ही छोटी छोटी गावं क्वारंटाईन करण्यात आली आहे.
 
ही महिला वेल्हा परिसरातील एका गावात गेली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने खबरदारी घेत, पानशेत परिसरातील अख्खं गाव क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर पानशेत परिसरातील अन्य गावातही खबरदारी घेतली जात आहे.
 
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 89 वर
 
“राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत 14 आणि पुण्यात 1 नवीन रुग्ण आढळला (Health minister Rajesh Tope Corona) आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 89 वर आहे. यातील 8 जण संपर्कात आल्याने बाधा झाली. तर 6 जण बाहेरुन प्रवास करुन आले आहेत,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.