मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (23:40 IST)

राज्यात ५३५ कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाला आहे. नेहमीप्रमाणे नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शनिवारी ९६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ५३५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.तर १० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
 
राज्यातील कोरोना प्रादुर्भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाला असल्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तसेच ज्या राज्यांतील कोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान  ५३५ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत एकुण ७८,६८,४५१ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३८ वर आली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १ लाख ४३ हजार ७३७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली नव्हती परंतु शनिवारी  ४५४ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात ४५४ अहवाल ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. आजपर्यंत राज्यात ५६६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.