गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (21:31 IST)

चांगली बातमी ! राज्यात बुधवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद

Good news! The state recorded zero corona deaths on Wednesdayचांगली बातमी ! राज्यात बुधवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद Marathi Coronavirus News  In Webdunia Marathi
सध्या कोरोनाची लाट ओसरत आहे. कोरोनाचा वेग मंदावला असून राज्यात लावलेले कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध देखील काढण्यात आले आहे. राज्यात दिलासादायक बातमी येत आहे. राज्यात आज बुधवारी शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्याचा मृत्युदर 1.82 टक्के झाला आहे.

तब्बल दोन वर्षानंतर सुखावणारी बातमी येत आहे. गेल्या दोन वर्षानंतर म्हणजे 1 एप्रिल 2020 नंतर प्रथमच राज्यात एक ही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. तर गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 544 नवीन प्रकरणे आले आहे. तर गेल्या 24 तासात 1 हजार 007 कोरोना बाधित रुग्णांना कोरोनापासून मुक्ती मिळून ते घरी परतले आहे. आता पर्यंत राज्यात तब्बल 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहेत. राज्यात सुमारे 45 हजार 422 व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. तर सुमारे 660 व्यक्ती हे संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहे. राज्यात 7 कोटी 80 लाख 3 हजार 848 लोकांचा चाचण्या प्रयोगशाळेत केल्या आहेत. 
 
राज्यात आज 38 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 102 ओमायक्रॉनचे सक्रिय रुग्ण आहे.