रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मार्च 2022 (11:45 IST)

कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये पुन्हा घट, गेल्या 24 तासांत 6561 नवीन रुग्णांची नोंद, 142 जणांचा मृत्यू

देशात कोरोना संसर्गाबाबत अपडेट जारी करण्यात आले आहे. अपडेटनुसार, आज देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,561 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, बुधवारी यापूर्वी कोरोनाचे 7,554 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.
 
मृतांच्या संख्येत घट
कोरोनाच्या नवीन रुग्णांसोबतच मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. गेल्या 24 तासात 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी बुधवारी 223 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दरम्यान 14,947 रुग्ण कोरोनापासून बरेही झाले आहेत.
 
कमी सक्रिय प्रकरणे
देशात कोरोनाचे सक्रिय रुग्णही झपाट्याने कमी होत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 77,152 वर आली आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनाचे 4,29,45,160 रुग्ण आढळले आहेत. एकूण 4,23,53,620 लोक यातून बरे झाले आहेत. त्याच वेळी, एकूण मृत्यू 5,14,388 झाले आहेत.