रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (08:28 IST)

राज्यात ६,०१७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येतही मोठी घट झाली आहे.दरदिवशी राज्यातील मृत कोरोनाबाधितांचा आकडा हा ५०० हून अधिक होती परंतु सोमवारी एकूण ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी ६ हजार १७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.तर १३ हजार ५१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 
 
राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तज्ज्ञांकडून ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.राज्यात मागील २४ तासात १३ हजार ५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.३५ % एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात ६,०१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख २० हजार २०७ झाली आहे. राज्यात सध्या एकूण ९६ हजार ३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
राज्यातील कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचणीमध्ये वाढ करण्याच्या सुचना प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५६ लाख ४८ हजार ८९८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.यापैकी ६२ लाख २० हजार २०७ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात एकूण सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.