सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑक्टोबर 2020 (09:48 IST)

राज्यात ६,०५९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद

राज्यात रविवारी ६,०५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५,६४८ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही १६,४५,०२० वर पोहोचली असून यांपैकी १४,६०,७५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आतापर्यत  ४३,२६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १,४०,४८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सध्याचा मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. सध्या २५,१८,०१६ लोक होम क्वारंटाइन आहेत तर १३,५७२ लोक हे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन आहेत.
 
पुणे शहरात दिवसभरात नव्याने २९२ रुग्ण आढळले तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनावर उपचार घेणार्‍या ४५४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं. पुणे महापालिकेच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६६ करोनाबाधितांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, ११९ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.