संबंधित माहिती
- महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे 63 हजार 309 नवे रुग्ण आढळले
- लॉकडाऊनचा कोणताही परिणाम दिसेना! राज्यात ६३, ७२९ नव्या रुग्णांची नोंद
- गेल्या 24 तासात विक्रमी 63 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, 349 जणांचा मृत्यू
- महाराष्ट्राच्या ठाण्यात कोरोना विषाणूचे 983 नवीन प्रकरणे, आतापर्यंत 6343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
- कोरोना केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
राज्यात 63,309 नवे कोरोना रुग्ण, 985 मृत्यू
राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख चढताच आहे. गुरुवारी 63 हजार 309 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 लाख 73 हजार 394 वर जाऊन पोहोचली आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 37 लाख 30 हजार 729 रुग्ण उपचारा अंती बरे झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 83.40 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
तर 985 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 67 हजार 214 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 42 लाख 03 हजार 547 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 31 हजार 159 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 65 लाख 27 हजार 862 नमूने तपासण्यात आले आहेत.
