सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (07:39 IST)

राज्यात 9,558 नवे रुग्ण; 8,899 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 9 हजार 558 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 8 हजार 899 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 22 हजार 893 एवढी झाली आहे. त्यापैकी 58 लाख 81 हजार 167 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 625 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात  147 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 23 हजार 857 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.06 एवढा झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 31 लाख 24 हजार 800 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 34 हजार 423 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 645 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.