शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (21:22 IST)

आप नेता राघव चड्डा यांना देखील कोरोनाची लागणं झाली

आम आदमी पार्टी (आप)नेते आणि दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष राघव चड्डा यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना कोरोना विषाणूची लागण लागली आहे. चड्डा म्हणाले की अद्याप त्यांना संसर्गाची काहीच गंभीर लक्षणे नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून ते काही दिवस विलगीकरण कक्षात राहणार आहेत.
 
आपच्या प्रवक्त्याने ट्विट केले आहे की ,मी आपल्याला सांगू इच्छितो की मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी थेट संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करतो की आपल्याला देखील काही लक्षणे आढळल्यास आपण स्वतःची तपासणी करून घ्यावी आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना करा.स्वतःचे  आणि इतरांचे संरक्षण करण्याची आणि व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्याची जबाबदारी आपली आहे.