गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (22:38 IST)

रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती

राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीरसाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.
 
राज्य सरकारने केंद्र आणि इतर राज्यांमधून रेमडेसिवीर मिळते का याची तपासणी करून झाली आहे.  त्यामुळे राज्य सरकारने थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये रेमडेसिवीरसाठी जाहिराती दिल्या आहेत.
 
या जाहिरातींना काही देशातून प्रतिसादही आल्याची माहिती समोर येत आहे. सिंगापूर, बांग्लादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन  पुरवण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारचा या देशांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच त्याबाबतची प्रकिया सुरू करणार असल्याची माहिती मिळतेय.