शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (10:17 IST)

कोरोना ब्लास्ट: अमरावती महापालिकेतील 80 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

Amrawati Municipal Corporation 80 Employees tested Corona Positive
अमरावती- अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यापैकी 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू  झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना बाधिता मध्ये झोन क्रमांक 1,2,3 चे सहायक आयुक्त, शहर अभियंता, सिस्टीम मॅनेजर, विधी अधिकारी, डेप्युटी इंजिनिअर, डॉक्टर, लिपिक इतरांचा समावेश आहे. 
 
अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 671 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 7 रुग्णांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण वाढणारी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 
 
अमरावती शहरातील कार्यालये सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. शहरातील अनेक भाग देखील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अमरावती जिल्हात आतापर्यंत 30,067 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 7002 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.