राज्यात गुरुवारी ५ हजार ४२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश सरकारकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शनिवार ते सोमवार जारी करण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी ५ हजार ४२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३८ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ८१ हजार ५२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात राज्यातील २ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील १९ लाख ८७ हजार ८०४ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४० हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५५ लाख २१ हजार १९८ प्रयोगशाळा नमनुयांपैकी २० लाख ८१ हजार ५२० (१३.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख १६ हजार ९०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.