1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (22:34 IST)

कोव्हीशील्ड मध्ये 11 महिन्याचे अंतर ठेवल्यास 18 पटीने जास्त अँटीबॉडीज बनतील -अभ्यासक

An interval of 11 months in the cove shield will produce 18 times more antibodies - Practitioner coronavirus news in marathi
नवी दिल्ली.:अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची अँटी कोविड -19 लस 45 आठवड्यांच्या अंतराने दिल्यावर चांगली प्रतिकारक शक्ती निर्माण करते.तसेच याचे तिसरे डोस अँटीबॉडीज वाढवतात.
 
ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासात हा दावा केला गेला आहे. अभ्यासानुसार, कोव्हीशील्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसच्या एकाच डोसनंतर अँटीबॉडीजची पातळी कमीतकमी एक वर्ष टिकते.
 
भारतात, दोन डोस दरम्यान 12 ते 16 आठवडे अंतर ठेवले गेले आहे.अभ्यासाच्या लेखकांनी असे नमूद केले की अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसच्या दरम्यान 45 आठवडे किंवा 11 महिन्यांच्या विस्तारित अंतरामुळे दुसर्‍या डोसच्या 28 दिवसांनंतर अँटीबॉडीच्या पातळीत 18 पट वाढ झाली.हा अभ्यास सोमवारी लाँसेटच्या प्री-प्रिंट सर्व्हरमध्ये पोस्ट केला गेला आहे.
 
अभ्यासामध्ये 18 ते 55 वर्षे वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश होता. त्यांना  अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचा एक डोस दिला गेला. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. प्रथम आणि द्वितीय डोस आणि त्यानंतरच्या डोस दरम्यानच्या अंतराच्या नंतर त्यांनी प्रतिकारशक्तीचे मूल्यांकन केले.
 
अभ्यासातून असे दिसून आले आहे की पहिल्या आणि दुसर्‍या डोसच्या 45 आठवड्यांच्या अंतराने,दिल्यावर अँटीबॉडीची पातळी 12 आठवड्यांच्या अंतराने दिल्या गेलेल्या डोस पेक्षा 4 पटीने जास्त होती.अभ्यासानुसार.संशोधकांनी असे म्हटले आहे की दोन डोसांमधील दीर्घ अंतरामुळे मजबूत प्रतिकारशक्तीचा विकास होतो.
 
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ऑक्सफोर्ड लस समूहाचे संचालक अँड्र्यू जे पोलार्ड म्हणाले की, कमी लस पुरवठा करणाऱ्या देशांसाठी ही आश्वासक बातमी असावी. पोलार्डने निवेदनात म्हटले आहे की पहिल्या डोसनंतर 10 महिन्यांच्या अंतराने दुसरा डोस दिला गेला.आणि त्याचे चांगले परिणाम बघायला मिळाले.
 
 
भविष्यात काही देश तिसर्‍या 'बूस्टर' डोसवर विचार करीत आहेत असे संशोधकांनी नमूद केले.अभ्यासाच्या निकालांनुसार, कोविड -19 च्या अल्फा,बीटा आणि डेल्टा प्रकारां विरूद्ध तिसरा डोस अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.