1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (22:31 IST)

.पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने डॉक्टर्सनी वेळीच कोविड लक्षणे ओळखून उपचार सुरु करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

As infection is likely to increase in rainy season
मुंबई : पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
 
मुख्यमंत्री श्री. ठाकरे आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्सदेखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथम त्यांचे  आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही आपले विचार मांडले.
 
प्रास्ताविक महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी केले तर डॉ. अर्चना पाटे यांनी सूत्र संचलन केले. या ऑनलाईन परिषदेसाठी २१ हजार ५०० डॉक्टर्सनी नोंदणी केली होती.