सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (11:56 IST)

कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे 12 जिल्ह्यांत मृत्यूचं प्रमाण दुप्पट

गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 84 हजार 601 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 3 हजार 617 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे. 
 
पण कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील मृत्यूच्या संख्येत तीव्र वाढ दिसून आली आहे. सिंधुदुर्ग, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली जिह्यांत मृत्यूची संख्या पहिल्यापेक्षा दुप्पट झाली आहे. 12 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू ओढवले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सातारा आणि संगली जिल्ह्यांतील रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होऊनही मृत्यूची संख्या निम्म्यावर आली आहे. 
 
पाचही जिल्ह्यांचे पहिल्या लाटेत मोठे नुकसान झाले होते. राज्य कृती दलाचे सदस्य आणि कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, की वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या किंवा आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमकुवत असलेल्या जिल्ह्यांमध्ये मृत्यूची संख्या जास्त आहे. मनुष्यबळाची कमतरता, चाचण्यांचे प्रमाण कमी आणि छोट्टा नर्सिंग होमची अपुरी संख्या अशी काही समस्या आहेत.