1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (21:51 IST)

अशाेकराव चव्हाण यांना पुन्हा काेराेना लागण

Ashokrao Chavan
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांचा काेराेना चाचणी अहवाल गुरूवारी सायंकाळी पाॅझिटिव्ह आला. गेली चार दिवस अशाेकराव चव्हाण नांदेडमध्ये हाेते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे भुमिपुजन, उद्घाटन केले. प्रजासत्ताक दिनी ध्वजाराेहण केले, त्यानंतर ते दुपारी मुंबईला रवाना झाले. त्यांना गुरूवारी रात्री गाेवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पणजी येथे जायचे हाेते. मात्र, अंगात किंचित ताप वाटल्याने त्यांनी काेराेना चाचणी केली.
 
दरम्यान, ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित हाेते. आपला अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे कळताच ते या बैठकीतून बाहेर पडले. मात्र त्यांना काेणताही त्रास जाणवत नसल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही खबरदारी म्हणून काेराेना चाचणी केली जात आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच काेराेना चाचणी करून घ्यावी, आराेग्याची काळजी घ्यावी व काेराेना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.