1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (18:47 IST)

कोरोनाला हरविण्यासाठी पतंजलीने सुरू केली वैद्यकीय चाचणी

baba ramdevs
गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोविड १९ च्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पतंजलीने ही चाचणी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
याबाबत पतंजली कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी असे सांगितले की, “आम्ही फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबद्दल बोलत नाही तर आम्ही कोरोनाच्या उपचाराबद्दल सांगत आहोत. गेल्या आठवड्यात नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कंपनीने इंदूर आणि जयपूरमध्ये कोरोना व्हायरसच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत”
 
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतजली समुहाने कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार सुरू केले होते. मार्च महिन्यापर्यंत पतंजलीने अनेकांवर उपचार केले. परंतु ते वैद्यकीय चाचणीचा भाग नव्हते. आमच्या संशोधनाला उपचाराच्या रुपात आणण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. याकडेच पाहता नियामक मंडळाची मान्यता घेतल्यानंतर याची वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली असल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले आहे.