योगगुरू बाबा रामदेवकडून ई कॉमर्स पोर्टल लाँच ‘ऑर्डर मी’

Baba Ramdev
Last Modified शुक्रवार, 15 मे 2020 (20:35 IST)
बाबा रामदेव यांच्या कंपनीनं ‘ऑर्डर मी’ या नावानं वेबपोर्टल लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोर्टलवर पतंजलीशी निगडीत उत्पादनांच्या विक्री करण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्य स्वदेशी उत्पादनांचीदेखील विक्री करण्यात येईल. याद्वारे विक्री करण्यात येणारी उत्पादनं ऑर्डर केल्यानंतर काही तासांमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसंच घरपोच सेवाही मोफत दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इतकंच नाही तर या पोर्टलद्वारे मोफत वैद्यकीय सल्लादेखील देण्यात येणार आहे. पतंजलीशी निगडीत १ हजार ५०० जणांना याद्वारे संपर्क साधता येणार आहे. या महिन्याच्याच अखेरिस हे पोर्टल लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ऑर्डर मी या पोर्टलवर केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री केली जाणार आणि त्यांचाच प्रचारही केला जाईल. सर्व स्थानिक रिटेलर्स आणि छोट्या दुकानदारांना जोलं जाईल आणि स्वदेशी उत्पादनांची विक्री कशी वाढवता येईल याचा विचार गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

टॅक्सी चालकांना पाण्याची बॉटल देत केला त्यांच्या कार्याला ...

टॅक्सी चालकांना पाण्याची बॉटल देत केला त्यांच्या कार्याला सलाम
मुंबईची वाहतूक ही शहरातील महत्वपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे. आणि टॅक्सी सेवा हि त्यातीलच एक ...

राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवार दगडूशेठ मंदिर परिसरात

राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवार दगडूशेठ मंदिर परिसरात गेले?
राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद ...

शरद पवारांचे दगडूशेठ दर्शन

शरद पवारांचे दगडूशेठ दर्शन
पुणे: ब्राम्हण संघटनांसोबच बैठक घेतल्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ...

Realme च्या बँग सेलमध्ये जोरदार ऑफर, हे स्वस्त स्मार्टफोन ...

Realme च्या बँग सेलमध्ये जोरदार ऑफर, हे स्वस्त स्मार्टफोन फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहेत
तुम्ही 12 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्ससह स्मार्टफोन खरेदी करू इच्छित ...

लडाखच्या तुर्तुकमध्ये भीषण अपघात; रस्ता अपघातात भारतीय ...

लडाखच्या तुर्तुकमध्ये भीषण अपघात; रस्ता अपघातात भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद
लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या वाहन अपघातात आतापर्यंत 7 भारतीय लष्कराच्या जवानांना ...