शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मे 2020 (20:29 IST)

निसानचा बजेट कार लाँच, असे आहेत फिचर

निसानचा बजेट कार ब्रँड डॅटसनने भारतात BS6 Datsun GO+ कार लाँच केली आहे. ही गाडी ७ सीटर आहे.गाडीची किमत ४.१९ लाखापासून सुरु होत आहे. गाडीमध्ये दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झालं तर BS6 Datsun GO+ मध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन आहे जे ७७ PS पॉवर आणि 104 Nm एवढा टॉर्क जनरेट करते. इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
 
Datsun GO+ प्रारंभिक एक्स शोरूम किंमत ४.१९ लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या सीव्हीटी व्हेरिएंटची किंमत ६.६९ लाख रुपये आहे, जी सर्वात स्वस्त ७ सीटर सीव्हीटी बनवते. 
 
गाडी मध्ये षटकोनी लोखंडी जाळी, हॉक आय हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएलएस, बॉडी कलर बम्पर्स, डोर हँडल्स, १४ इंच डायमंड कट अ‍ॅलोय व्हील्स आहेत. या कारला सर्वोत्कृष्ट क्लास ग्राउंड क्लीयरन्स दिला गेला आहे जे १८० मिमी आहे. इंटीरियरबद्दल सांगायचे तर या कारमध्ये अँटी-फॅट सीट्स आहेत, ७ इंची स्मार्ट टचस्क्रीन जी अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते.
 
सेफ्टी फिचर्सविषयी बोलायचं झालं तर BS6 Datsun GO+ मध्ये वाहन डायनॅमिक कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, ब्रेक असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग असिस्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत. रंग पर्यायाविषयी बोलताना ही कार रुबी रेड (Ruby Red), ब्रॉन्झ ग्रे (Bronze Grey), अंबर ऑरेंज (Amber Orange), क्रिस्टल सिल्वर (Crystal Silver), विव्हिड ब्लू (Vivid Blue) आणि ओपल व्हाइट (Opal White) अशा ६ रंग पर्यायात उपलब्ध आहे. या कारला दोन वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी दिली जात आहे, जी पाच वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.