रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

ऑटो सेक्टरमध्ये 10 लाख नोकर्‍यांना धोका, सर्वात धोकादायक मोदी सरकारची शांतता

नवी दिल्ली- काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी ऑटो क्षेत्र संकटात असल्यासंबंधी बातमीवर नरेंद्र मोदी सरकारावर टिका करत म्हटले की या प्रकाराची शांतता सर्वात जास्त धोकादायक आहे.
 
त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'ऑटो सेक्टरच्या 10 लाख लोकांच्या नोकर्‍या संकटात आहे. येथे काम करणार्‍यांना आपल्या पोटापाण्यासाठी नवीन ठिकाणे शोधावे लागणार.
 
प्रियंका यांनी आरोप केला की, 'नष्ट होत असलेले रोजगार, कमजोर पडत असलेले व्यापार आणि अर्थव्यवस्थेची कंबर तोडणारी नीती यावर भाजप सरकाराची शांतता सर्वात अधिक धोकादायक आहे.'