सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: देहराडून , रविवार, 26 एप्रिल 2020 (10:26 IST)

एक मिनिट श्वास रोखून धरलात तर तुम्हाला कोरोना नाही : बाबा रामदेव

कुठलीही व्यक्ती एक मिनिटासाठी श्वास रोखून धरत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची बाधा झालेली नाही प्रसिद्ध योगगुरु बाबा रामदेव यांनी हा दावा केला. कोरोना व्हायरससाठी विशेष प्राणायाम असून त्याला उज्जायी म्हटले जाते, असे रामदेव यांनी सांगितले.

त्यांनी तो प्राणायमाचा प्रकार करुनही दाखवला. उज्जायी प्राणायाम करुन बघणे ही कोरोना व्हायरसची एकप्रकारे सेल्फ टेस्टिंग असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना हायपरटेंशन, हृदयाचा आजार, डायबिटीस आहे त्यांनी 30 सेकंदासाठी आणि तरुणांनी एक निटासाठी श्वास रोखून धरला तर याचा अर्थ तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. तुम्ही हा प्रयोग करुन बघू शकता असे रामदेव म्हणाले. त्याशिवाय रामदेव यांनी आणखी एक उपाय सांगितला. तुम्ही राईचे तेल तुमच्या   नाकपुड्यांमध्ये टाकले तर कोरोना व्हायरस वाहून खाली तुमच्या पोटामध्ये जाईल. तिथे असणार अ‍ॅसिडमुळे त्या व्हारसचा मृत्यू होईल असा दावा त्यांनी केला.