सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified रविवार, 2 मे 2021 (08:21 IST)

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ; २६ जिल्ह्यांमध्ये सायंकाळी सहापर्यंत ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना दिली लस

राज्यात शनिवार पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी २६ जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
 
शनिवारपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्ह्यांमध्ये  सुरुवात झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
 
सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.