बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2020 (11:54 IST)

ठाकरे सरकारची खर्चाला मोठी कात्री

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपायोजना केल्या जात आहेत. अशात राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी ठाकरे सरकारने सर्व खर्चांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 जून पर्यंत फक्त 15 ते 25 टक्केच निधी खर्च करा अशा सूचना राज्य सरकारने सर्व विभागांना दिल आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढतो आहे. अशात आरोग्यविषयक सोयींवर खर्च करणे जास्त आवश्क आहे. हीच बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाचं संकट सुरु असल्याने गोरगरीबांना रेशन दुकानांमार्फत धान्य वाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. पालकमंत्र्यांनी या संदर्भात आपल्या आपल्या जिल्ह्यात व्यक्तीशः लक्ष देण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.