1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (23:51 IST)

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा भीतीदायक ,रुग्णांची संख्या 26 हजारांच्या पुढे, ओमिक्रॉनचे 144 नवीन प्रकरणे आढळले

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने आता उद्रेक करायला सुरु केले आहे. बुधवारी राज्यात 26 हजार 538 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय 5 हजार 331 रुग्णही कोरोनामुक्त झाले आहेत. अशा प्रकारे, सध्या महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 87 हजार 505 वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गासोबतच कोरोनाच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्गही झपाट्याने वाढत आहे.
 
महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. बुधवारी राज्यात 144 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले. अशाप्रकारे राज्यात आतापर्यंत 797 ओमिक्रॉनचे रुग्ण समोर आले आहेत.ओमिक्रॉनमुक्त झालेले  330 रुग्णांना सोडण्यात आले आहे.
बुधवारी महाराष्ट्रात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशाप्रकारे राज्यातील मृत्यूदर सध्या 2.09 टक्क्यांवर गेला आहे. सध्या राज्यात 87 हजार 505 जणांवर उपचार सुरू आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत 65 लाख 24 हजार 247 लोक कोरोना मुक्त झाले आहे. राज्यातील रिकव्हरी चे प्रमाण सध्या 96.55  टक्के आहे. राज्यात सध्या 5 लाख 13 हजार 758 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 1366 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 97 लाख 77 हजार 007 जणांची कोरोना चाचणी झाली आहे.
मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. बुधवारी मुंबईत 15 हजार 166 नवीन रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी 10 हजार 860 रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच मुंबईत एकाच दिवसात 5000 रुग्ण वाढले. याशिवाय बुधवारी मुंबईतही कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत. 714 जणांची कोरोनामुक्ती झाली आहे.