शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (12:10 IST)

करोना रुग्णसंख्येत घट, राज्यात रुग्णसंख्येत ३३ टक्क्यांनी घट

देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 63 दिवसांनंतर संक्रमित लोकांची संख्या एक लाखाहून कमी झाली आहे आणि गेल्या 24 तासांत 86,498 नवीन प्रकरणं समोर आले आहेत. सक्रिय रूग्णांचे प्रमाण घसरुन 4.50 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, तर रिकवरी दर आता वाढून 93.29 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
 
राज्यात 10,219 नवे रुग्ण; 21,081 जणांना डिस्चार्ज
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस उतरणीला लागली आहे. महाराष्ट्रात सोमवारी 10 हजार 219 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 21 हजार 081 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 42 हजार इतका झाला आहे. त्यापैकी 55 लाख 64 हजार 348 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 95.25 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
 
राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 320 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला. राज्यात 154 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 470 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.72 टक्के एवढा आहे.
 
राज्याचा कोरोना राज्यात आतापर्यंत 3 कोटी 66 लाख 99 हजार 139 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 12 लाख 47 हजार 033 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 232 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
राज्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मृतांची संख्या कमी झाली असली तरी मृत्युदर मात्र साडेचार टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर गेला आहे.
 
22 ते 28 मे या आठवड्यात राज्यात 1,39,695  रुग्णांचे नव्याने निदान झाले आणि 5,898 रुग्णांचा मृत्यू झाला. 
20 मे ते 4 जून या आठवड्यात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या 92,350 पर्यंत घसरली. मृतांची संख्याही या आठवड्यात कमी झाली असून 4,741 मृत्यू झाले आहेत. 
राज्याचा एकूण मृत्युदरही 1.94  टक्क्यांवरून 1.69 टक्क्यांवर गेला आहे.