मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 8 जून 2021 (12:07 IST)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस उतरणीला लागली आहे

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस उतरणीला लागली आहे. महाराष्ट्रात सोमवारी 10 हजार 219 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 21 हजार 081 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 42 हजार इतका झाला आहे. त्यापैकी 55 लाख 64 हजार 348 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 95.25 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
 
राज्यात सध्या 1 लाख 74 हजार 320 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला. राज्यात 154 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 470 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.72 टक्के एवढा आहे.
 
राज्याचा कोरोना राज्यात आतापर्यंत 3 कोटी 66 लाख 99 हजार 139 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 12 लाख 47 हजार 033 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 232 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.