शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 10 जुलै 2021 (11:55 IST)

कोरोना:पुन्हा कडक निर्बंध लावले

कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे तरी ही अद्याप कोरोनाचे संकट कमी झाले नाही.राज्यात जरी लॉक डाऊन मध्ये शिथिलता दिली आहे तरी ही काही भागात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे.पारनेर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना बघता आणि या स्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दखल घेतल्यावर तिथल्या जिल्ह्या प्रशासनाने काही उपाय योजना हाती घेऊन तब्बल 22 गावांत आठ दिवसा पर्यंत कडक लॉक डाउन लावण्यात आले आहे.तसेच चाचण्यांची संख्या वाढवून गावातील काही शाळांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे.
 
पारनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने आता या कडे लक्ष केंद्रित केले असून उपाययोजना वाढवल्या आहेत. 
 
या तालुक्यातील निघोज,पठारवाडी,धोत्रे,टाकळी ढोकेश्वर,वडगाव गुंड,शिरसुले,रायतळे,लोणीमावळा,भाळवणी, पिंप्री जलसेन,जामगाव,पठारवाडी,जवळा,हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा,लोणी हवेली,पोखरी,वनकुटे,काकणेवाडी, खडकवाडी,सावरगाव,वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे.या गावांत 8 दिवस फक्त औषधे,पालीभाजा,दूध आणि कृषी सेवा केंद्रच सुरु असतील. 
 
तहसीलदार यांनी सांगितले की निर्बंध लावलेल्या या गावांत कोणत्याही समारंभास परवानगी देण्यात येणार नाही. मास्क न लावता फिरणारे लोक,विनाकारण फिरणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. 
 
गावांत बाहेरून येणाऱ्या लोकांना सात दिवस शाळेत विलगीकरणात राहावे लागणार तसेच ट्रक चालकांना देखील शाळेत विलगीकरणासाठी राहावे लागणार.कोरोनाच्या चाचण्या करण्यात येतील त्यात कोरोनारुग्ण आढळल्यावर त्यांना कोव्हीड सेंटर मध्ये राहावे लागणार.वाढदिवस,लग्न सारख्या समारंभास परवानगी दिली जाणार नाही.तसेच कोव्हीड च्या नियमांचे  पालन न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.